आपला नैसर्गीक वारसा जपण्याची गरज

Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Go to content

आपला नैसर्गीक वारसा जपण्याची गरज

Radhanagari Wildlife Sanctuary
Published by Jaysing Chavan in Treasure of Radhanagari · Friday 14 Jan 2022
Tags: Radhanagari&Dajipur
२०१४ साली चित्रकलेचे शिक्षण घेत असतानाच माझ्या हातात कॅमेरा आला. कोल्हापूर शहरातील गजबजलेली ठिकाणं आणि तेथील लोक यांची छायाचित्र टिपणं माझ्या आवडीचं झालं होतं.

एके दिवशी माझे शिक्षक गिरीश सर यांचे बरोबर  निसर्गसंपन्न आणि शांत अशा "दाजीपूर" ला जाण्याची संधी मिळाली. आमच्या बरोबर काही निसर्ग अभ्यासक पण होते. त्यांच्या बरोबर पहिल्यांदाच निसर्ग वाचनाची ओळख झाली. आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी इतकं काही आहे. डोळ्यांनी दिसणारं जग वेगळंच पण सूक्ष्म ते अति सूक्ष्म जग हे वेगळंच. याची जाणिव तेव्हा पहिल्या फेरीतच मला झाली. ती पहिली फेरीच इतकी अभ्यासपूर्ण होती की त्यामुळे माझा या अभयारण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला. त्या नंतर आता पर्यंत खूप वेळा दाजीपुर जंगल भ्रमंतीसाठी मी सातत्यानं येत आहे.

दाजीपुर म्हणजे नुसता "गवा" हा विचार जर बाजूला ठेऊन अभयारण्यात पाहिलं तर खूप काही आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत. फुलपाखरांचं एक विलोभनीय आणि अद्भुत जग इथं अस्तित्वात आहे.

जंगलाची होणारी नासधूस आणि यामुळे पर्यावरणीय समस्या आता काही कालपोकल्पित कथा राहिल्या नाहीत. वस्तुस्थिती आता अगदी स्पष्ट आहे. आपण चाललो आहोत तो एक विनाशकारी मार्ग आहे आणि याचा आपण कोल्हापूरकरांनी आणि सगळ्या जगानं सुद्धा अनुभव घेतला आहे. आपण स्वतःचा विनाश ओढवण्यात मग्न आहोत. इतका मोठ्ठा वारसा आपल्याला अभ्यासासाठी आणि वाढवण्यासाठी उपलब्ध असताना कोल्हापूरकरांना या जागतिक वारशाबद्दल जास्त माहीत नाही असं मला वयक्तिक वाटतं.

अभयारण्य म्हणजे मज्जा, मस्ती, दंगा हा विचार बाजूला ठेऊन नव्या पिढीला ती एक आपली वैयक्तिक जवाबदारी आहे हा विचार द्याला हवा. आपण आजच सुधारात्मक कार्यकृती केली नाही तर आपण जो  वारसा पुढे आपल्या मुलाबाळांना देऊ ज्यांची आपल्याला लाज वाटेल. आपली पुढील पिढी आपला द्वेष करेल यात शंकाच नाही.

-
जयसिंग चव्हाण, कोल्हापूर.
आर्टिस्ट आणि फोटोग्राफर
संपर्क - 9503086629


For Value Added Tourism of Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Call us or Whatsapp .
Call or Whatsapp .
For Tourism Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Back to content